एक्स्प्लोर

'स्वाभिमानी'तला वाद मिटला, राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

राजू शेट्टी यांचे विधानपरिषदेला नाव निश्चित झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही नेते नाराज असल्याचं समोर आलं होतं. ही चर्चा सुरू झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको असं म्हटलं होतं

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला असून आता राजू शेट्टी आमदारकी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं नावं निश्चित करण्यात आलं होतं. यासंदर्भात शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. मात्र यानंतर संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ब्यादच आपल्याला नको, असं म्हटलं होतं. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत समोरून झालेले तलवारीचे घाव भरून निघतात, पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. चळवळ संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण आम्ही रक्त सांडून चळवळ उभा केलीय, कुणाचा मायावी प्रयत्नाने संपणार नाही, असं म्हटलं होतं. हे ही वाचा- नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको : राजू शेट्टी राजू शेट्टी यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर राज्यभरातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आमदारकी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा अध्यक्षा पूजा मोरे यांनी तर रक्ताने पत्र लिहित राजू शेट्टी यांनी विधानपरिषद आमदारकी स्वीकारावी अशी मागणी केली होती. तर शेट्टी यांनी आमदारकी न स्वीकारल्यास काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला होता. हेही वाचा - राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर यानंतर काल राजू शेट्टी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राजू शेट्टी यांनी या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर केली. काल या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर वादावर पडदा पडला. चळवळीला नख लागेल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही असं नाराज झालेल्या दोन्ही नेत्यांनी राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलं होतं. चर्चेतून नाव पुढे यावं अशी नाराज नेत्यांची मागणी होती. BLOG | पुन्हा एकदा शेतकरी चळवळीची पांगापांग!

महत्त्वाच्या बातम्या

आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget