एक्स्प्लोर
अमित शाहांसोबत चर्चेचं निमंत्रण राजू शेट्टींनी नाकारलं!

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आजपासून (16 जून) तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजपच्या मित्रपक्षांशी चर्चा करण्याचं अमित शाह यांनी ठरवलं होतं. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं आहे. राज्यात भाजप घटकपक्षांच्या मदतीने सत्तेत आहे. या घटकपक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मुख्य पक्ष आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत चर्चेसाठी भाजपकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना फोन करुन निमंत्रण दिलं. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी नकार कळवला. खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंदोलनासाठी दिल्लीत आहेत. दिल्लीत देशभरातल्या शेतकरी नेत्यांना एकत्र करुन शेट्टी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. शिवाय, महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी हे गैरहजर राहणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, ज्या पक्षासोबत सत्तेत आहोत, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शाह यांनाच थेट नकार कळवल्याने राजू शेट्टींच्या भूमिकेबद्दल चर्चा वाढली आहे.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















