एक्स्प्लोर

Raju Shetti :  कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग ते शेतकऱ्यांचं 15 हजार कोटींचं नुकसान, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल 

महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आता पाळायला तयार नाहीत असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे.

Raju Shetti : महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आता पाळायला तयार नाहीत. शेत मजुरापेक्षा देखील शेतकऱ्यांची बिकटअवस्था आहे असा केंद्राचाच रिपोर्ट असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी हमीभावावर 20 टक्के अनुदान देऊ सांगितलं होते. मात्र, तेही आश्वासन पूर्ण केलं नाही. सोयाबीन, कापूस, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचे जवळपास 15 हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच हमीभावावर 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांनी केली होती. मात्र, आता सरकार स्थापन होऊन पाच महिने पूर्ण झाले तरी अद्याप महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळं शेतकरी आक्रम होताना दिसत आहेत. तसेच राजू शेट्टींनी देखील शेती प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. 

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान 

सरकारने 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिले होते. आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर दिलं का? असा सवाल देखील शेट्टी यांनी केला. अवकाळी पावसाचे थैमान आहे, भांडवली शेतीचं नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. भाजीपाला, फळांचे नुकसान झाले, पंचनामे होत नसल्याचे शेट्टी म्हणाले. ठिबक सिंचनाचे अनुदान रखडले आहे. अशात शेतकऱ्यांनीच संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेट्टी म्हणाले. 

शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळा होणार, राजू शेट्टींचा निशाणा

शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही. आधीच रत्नागिरी-नांदेड महामार्ग असताना समांतर रस्ता त्याला बनवल्यास आमचा विरोधच असेल असेही शेट्टी म्हणाले. ग्रामीण भागात जेव्हा मंत्री नेते फिरतील तेव्हा आम्ही जाब विचारु असेही शेट्टी म्हणाले. आम्ही गप्प आता बसणार नाही. शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळा होणार असल्याचे शेट्टी म्हणाले. हा मार्ग बांधण्याचा विचार केला तर 800 किमीसाठी 30 ते 35  हजार कोटी खर्च होतो. मात्र, हा खर्च 86 हजार कोटींवर जात असल्याचे शेट्टी म्हणाले. सक्तीनं शेतकऱ्यांच्या जमिनी यात घेतल्या जाणार आहेत. सर्व राजकीय नेते लोकप्रतिनिधींचे हात ओले होणार आहेत. आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. 

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, ते ही अतिरेकीच; पहलगामनंतर राजू शेट्टींच्या निशाण्यावर सरकार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित, कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित, कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Embed widget