एक्स्प्लोर

शेतकऱ्यांनो, भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढा : राजू शेट्टी

पाकिस्तानमधून चोरट्या मार्गाने साखर आयात केल्यानं भारतातल्या साखरेचे दर पाडले, त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना एफआरपी देऊ शकत नसल्याची ओरड करतायत, मात्र आम्ही त्याविरोधातही लढा देणार असल्याची घोषणाही त्यावेळी शेट्टी यांनी केली.

उस्मानाबाद : गारपीट नुकसानग्रस्तांनी सरकारची तूटपुंजी मदत घेण्यापेक्षा भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. तसेच, मंत्र्यांना झोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल, शेतकऱ्यांनीही सोबत यावे, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. “सहकारमंत्री देशमुख म्हणतात, भाजप सरकारने 23 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेकांना दमडीही मिळालेली नाही, मात्र सरकार सातत्याने फसव्या घोषणा करत आहे. आता गावागावातील बँका कर्जमाफी घोषणेनंतरच्या सहा महिन्यांचे व्याज आकारणीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.” असा आरोप खासदार शेट्टी यांनी केला आहे. “शेतकऱ्यांनी संघटीत शक्तीच्या बळावर समस्यांसाठी लढले पाहिजे. आम्ही लढतोय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धसका सरकारनं घेतला आहे. त्यामुळेचं मंत्री दौऱ्यावर आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड होत आहे. तसेच मंत्रालयाला जाळी लावल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील हा जावईशोध कुठल्या मुर्ख मंत्र्यांने लावलाय हे कळेना.” अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच, पामतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले, मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्या, त्यामुळे तुरीचे दर पडले, हा सरकारच्या चुकीच्या आयात धोरणाचा परिणाम आहे. त्यामुळे शेतकरी कर्जात बूडतोय, यामागे शेतकऱ्यांचा दोष नाही. त्यामुळे आम्ही कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करण्यासाठी सातबारा करण्याची मागणी करत असल्याचंही ते म्हणला आहेत. पाकिस्तानमधून चोरट्या मार्गाने साखर आयात केल्यानं भारतातल्या साखरेचे दर पाडले, त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना एफआरपी देऊ शकत नसल्याची ओरड करतायत, मात्र आम्ही त्याविरोधातही लढा देणार असल्याची घोषणाही त्यावेळी शेट्टी यांनी केली. दरम्यान, उस्मानाबादमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्यन शुगर साखर कारखाना आणि जयलक्ष्मी कारखान्यांनी पैसे बुडवलेले आहेत. दोन वर्षे थांबूनही पैसे मिळत नाहीत. आता त्याविरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget