एक्स्प्लोर

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती केली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या (Final Year Exam) परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांना पत्र लिहून राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी ही मागणी केली आहे.  मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनीया पत्रात म्हटलं आहे. राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परिक्षा रद्द करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी युजीसी ( विद्यापीठ अनुदान आयोगाला) पत्र पाठवलं होतं. या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर हा अंतिम वर्षतील अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा असं या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं होतं. आता या प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेतली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार; राज्यपालांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की, देश गेले दोन महिने लॉकडाऊनमध्ये आहे आणि सध्याची किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं जर लॉकडाउन शिथील झाला तरी याचा अर्थ करोना संपला असा होत नाही हे आपणदेखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?,” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे पत्रात म्हणतात, कोरोनाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्हीदेखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं प्रयोजन काय ? टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं अपरिमित नुकसान जाणून देखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झेलली. का तर जीव वाचला तर पुढे सगळं शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?,” असंही त्यांनी म्हटलंय. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून यूजीसीला परवानगीसाठी पत्र पत्रात  राज ठाकरे पुढे म्हणतात की, परीक्षा रद्द करणे म्हणजे ससरकट विद्यार्थ्यांना पास करणं असा होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांना घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल. मला खात्री आहे अनेक शिक्षणतज्ञांनी या विषयीचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील. पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई; पुण्याचं राजकारण तापलं
Maharashtra Live blog updates: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई; पुण्याचं राजकारण तापलं

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget