(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर राज ठाकरेंचं अप्रत्यक्ष वक्तव्य, म्हणाले...
Raj Thackeray vs Sanjay Raut : मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. आमचं राजकारण नकलावर चालत नाही, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं होतं.
Raj Thackeray vs Sanjay Raut : मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. आमचं राजकारण नकलावर चालत नाही, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं होतं. आता राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर अप्रत्यक्ष बोट ठेवलं आहे. संजय राऊतांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी संजय राऊत कुटुंबीयांच्या ईडी चौकशीवर अप्रत्यक्ष बोट ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केली होती.त्यानंतर राऊत यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंच्या हस्ते शनिवारी ठाण्यातल्या दिव्यात मनसेच्या शाखेचं उद्घाटन पार पडलं..यावेळी शेकडो मनसैनिक उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
पाहा व्हिडिओ
आमचं राजकारण नकलांवर उभं नाही, आम्ही बोलत राहू; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
आमचं राजकारण हे नकलावर उभं नाही, आम्ही बोलत राहू असा टोला खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, परखड मत व्यक्त करत राहू असंही ते म्हणाले. मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. खासदार संजय राऊत म्हणाले की, आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही. आम्हाला ईडीने बोलावलं म्हणून आम्ही बोलत राहिलो, आणि यापुढेही बोलतच राहू. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, जे खरं असेल ते परखडपणे बोलणार. कर नाही त्याला डर कशाला?
काय म्हणाले होते राज ठाकरे?
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे."