एक्स्प्लोर

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं.

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं. डीएसके आर्थिक अडचणीत सापडले आहेत, मात्र ते फसवणूक करणाऱ्यांपैकी नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. मराठी व्यवसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून काही राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. दरम्यान, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या डीएसकेंच्या गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मिळतील असा विश्वास व्यक्त केला. गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. पुणे सत्र न्यायालयाने डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर,  मुंबई उच्च न्यायालयाने तीनवेळा डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ दिली. डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडे आठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते. कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी दरम्यान गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर डीएसकेंनी मंगळवारी पहिल्यांदाच  पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. “मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं. संबंधित बातम्या बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Beed Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला मोठा धक्का; हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला मोठा धक्का; हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Kailas Patil and Omraje Nimbalkar: केंद्रीय पथकाचा दौरा म्हणजे फक्त इव्हेंट; कैलास पाटलांचा सरकारवर घणाघात; ओमराजे निंबाळकर म्हणाले, 'प्रत्येक गोष्टीत राजकारण...'
केंद्रीय पथकाचा दौरा म्हणजे फक्त इव्हेंट; कैलास पाटलांचा सरकारवर घणाघात; ओमराजे निंबाळकर म्हणाले, 'प्रत्येक गोष्टीत राजकारण...'
Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget