एक्स्प्लोर

कोथरूडमध्ये भाजपने बाहेरचा उमेदवार लादला : राज ठाकरे

कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं रहायला त्यांना भीती का वाटली? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी कोथरूड येथील सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

पुणे : कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला आहे. कारण सत्ता डोक्यात गेलं की जनतेला गृहित धरलं जातं आणि  त्यांनी कोथरूडकरांना गृहित धरलं. कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं रहायला त्यांना भीती का वाटली? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी कोथरूड येथील सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सत्ता डोक्यात जाते तेव्हा अशा कृती केल्या जातात असा आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्राला काय झालं आहे ते मला समजत नाही. महाराष्ट्राचा तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. एवढंच नाही तर कोथरुडची निवडणूक तुम्हा सगळ्यांसाठी सोपी आहे. तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे की बाहेरुन आयात केलेला उमेदवार हवा आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणूक झाल्यावर चंद्रकांत पाटील हे मतदारांच्या हाती तरी लागणार का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला. महापुरुषांचीही  जातीनिहाय वाटणी करण्यात येत आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. शिवाजी महाराज मराठ्यांचे, सावरकर ब्राह्मणांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे अशी जातीनिहाय वाटणी केली जाते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा विचार दिला आहे आज या महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न पडतो असंही राज ठाकरे म्हणाले. मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उद्ध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उद्ध्वस्त केला त्यांना राम गणेश गडकरी माहित आहेत का ?आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो मेट्रोने सुटणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Nashik Rain: नाशिकवर ढगफुटीचं संकट! उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आदेश
नाशिकवर ढगफुटीचं संकट! उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आदेश
Khadakwasla Dam : सावधान! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग शक्य; नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, प्रशासनाच्या सूचना
सावधान! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग शक्य; नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, प्रशासनाच्या सूचना

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
फडणवीसांचा विश्वासू शिलेदार मिसिंग लिंकवर पोहोचला,शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Embed widget