Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा रुद्रावतार! स्वतः ठाणे-मुलुंड टोल नाक्यावर उभं राहून वाहनं सोडली; अधिकाऱ्यांची खरडपट्टी
Raj Thackeray : आज नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले.
Raj Thackeray : टोलच्या झोलवर सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा टोलनाक्यावर झालेली गर्दी पाहून स्वत: रस्त्यावर उतरून वाहनांची गर्दी कमी केली. यावेळी हजारोंच्या संख्येनं वाहने नाक्यावर पाहून राज यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांची सुद्धा खरडपट्टी केली. आज नाशिक दौऱ्यातही त्यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. आज नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले. यावेळी अडकलेल्या शेकडो वाहनांना रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत सज्जड दम दिला.
आज नाशिक दौरा आटोपून मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः मा.राजसाहेब ठाकरे नेहमी प्रमाणे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता… pic.twitter.com/WdexyP7jnE
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 2, 2024
तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत?
दरम्यान, नाशिक दौऱ्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, टोलला माझा विरोध नाही. माझी मागणी आधीपासून इतकीच आहे. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी जी आपल्याकडे नाही. जगभरात टोल असतोच, पण आपल्याकडे नक्की किती टोल भरलाय ह्याचा हिशोब लोकांना दिला जात नाही ह्याचा मला राग आहे. उद्या (3 फेब्रुवारी) मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या समोर मध्यंतरी टोलनाक्यांवर जी आकडेवारी गोळा केली आहे ती सादर करणार आहे. लोकांच्या पैशानी जर टोलचा कंत्राटदार गब्बर होणार असेल किंवा राजकीय पक्षांच्या निधीत भर पडणार असेल तर माझा विरोध आहे. पत्रकारांना टोलच्या आंदोलनानंतर फुटलेल्या काचा तुम्हाला दिसतात पण तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत?
२ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे :
— Raj Thackeray (@RajThackeray) February 2, 2024
१) आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेले काही महिने पक्षातील पदाधिकारी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन महाराष्ट्र सैनिकांशी बोलत आहेत, त्या त्या मतदारसंघाची चाचपणी करत आहेत.. कुठे… pic.twitter.com/iQ5XTRa4fC
इतर महत्वाच्या बातम्या