Ulhasnagar news : उल्हासनगरात महापालिकेच्या (ulhasnagar municipal corporation) बंद पडलेल्या वास्तूत गावठी दारूचा अड्डा थाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला. महापालिका उपायुक्तांनी धाड टाकत हा प्रकार समोर आणला. नेमका प्रकार काय?


महापालिकेच्या वास्तूत हातभट्टीचा अड्डा


उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागच्या बाजूला महापालिकेचं बंद पडलेलं जकात कार्यालय आहे. या कार्यालयात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांना सोबत घेत त्या ठिकाणी धाड मारली तेव्हा बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या, दोन कॅनमध्ये गावठी दारू विकण्यासाठी तिथे आणल्याचं समोर आलं. सोबतच स्टीलचे ग्लास, बाक हे देखील तिथे आढळून आले. त्यानंतर हे सर्व साहित्य जप्त करत हेमंत कांबळे आणि उदय गायकवाड या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


पालिका आणि पोलिसांकडून धाड टाकत अड्डा उध्वस्त


उल्हासनगर महानगरपालिकेच्या खाली वास्तूत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा (Alcohol production) थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिका आणि पोलिसांनी (Municipal and police action) धाड टाकून हा अड्डा उध्वस्त केला आहे.  या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजत आहे. महाराष्ट्र शासनाने जकात बंद केल्यावर तीनचार वर्षांपूर्वी याठिकाणी श्वानांवर नसबंदीची प्रक्रिया हाताळली जात होती. मात्र हे कामही निविदे अभावी ठप्प पडल्याने जकात नाका बंदच असल्याचे समजते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :