Russia Ukraine Conflict : युक्रेन आणि रशियामधील संघर्षामुळे जगभरात खळबळ माजली आहे. आता या युद्धजन्य परिस्थिती इतर कोणते देश रशियाच्या आणि युक्रेनच्या पाठिशी उभे असणार आहेत, हे येत्या काळात समजेल. यावेळी भारताच्या भूमिकेबाबतही वृत्त समोर येत आहे. भारताने युक्रेन आणि रशियामधील युद्धात तटस्थ भूमिका घेत शांततेचं आवाहन केलं आहे. दरम्यान, एका रशियन अभ्यासकाने युक्रेन-रशिया संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संघर्षाशी केली आहे.


आंतरराष्ट्रीय विषयांचे रशियन अभ्यासक अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी रशिया-युक्रेन संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संबंधांशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'जसा भारतासाठी पाकिस्तान आहे, तसा रशियासाठी युक्रेन आहे.' पुतीन रशियामध्ये युक्रेनला सामावू इच्छित आहे का यावर त्यांनी नाही असे म्हटले आहे. युक्रेनचा मोठा भाग स्टालिनिस्ट राजवटी, कम्युनिस्ट राजवटी इत्यादींनी युक्रेनला कसा दिला हे पुतिन यांनी भाषणात सांगितले. 


'युक्रेन मुद्द्याचा निर्णय तडजोडीने घ्यावा लागेल'


पुतिन यांनी स्पष्ट केले की, 'युक्रेनने डीकम्युनिझेशन सुरू केले आणि वास्तविक डीकम्युनिझेशन काय आहे रशिया युक्रेनला दाखवू शकतो आणि यामुळे युक्रेन त्याचे सर्व प्रदेश गमावू शकते.' अभ्यासक अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी पुढे सांगितले की, 'मला वाटत नाही की पुतिन यांना युक्रेनचा रशियामध्ये समावेश करायचा आहे कारण आमच्यासाठी, याला राजकीय समाधानाची आवश्यकता आहे. युक्रेन मुद्द्याचा निर्णय तडजोडीने घ्यावा लागेल, समावेश करून नाही.'


'भारत तटस्थ भूमिका घेईल'
त्यांनी भारताच्या भूमिकेबद्दल सांगितले की, काही प्रदेशांवर भारतीय अधिकार आणि भारतीय मालकी मिळवण्यात भारताचा खूप समृद्ध इतिहास आहे. गोवा, हैदराबाद, सिक्कीमबाबत सर्वांनाच माहित आहे. या सर्व प्रकरणात रशियाने भारताला पाठिंबा दिला, रशिया कधीच भारताच्या विरोधात नव्हता. आणि त्यामुळे आम्हाला आता भारताची स्थिती समजते. भारत हा आमचा जुना चांगला मित्र आहे, आणि आम्हाला हे समजले आहे की भारताला युएस, महासत्ता आणि वर्चस्वाच्या जवळ जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला वाटते की भारत आपली तटस्थ भूमिका कायमरू ठेवेल आणि परिस्थितीत वरचढ राहील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha