Kishori Pednekar on Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनीच मला फ्लॅट द्यावेत असा उपरोधिक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांना टोला लगावला. 


महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी त्यांच्याकडे असलेले फ्लॅट मला द्यावेत असे म्हटले. भावाकडून बहिणीला भेट दिली जाते. त्याप्रमाणेच किरीट भावाने मला त्याच्याकडील प्लॅट मला द्यावे असे म्हणत महापौरांनी आरोप फेटाळले. 


काय म्हणाले होते किरीट सोमय्या? 


किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, "यशवंत जाधव (Yashwant Jadhav) बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत होते. मी काल महाविकासआघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावं विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाला आहे. किशोरी पेडणेकरांनी एसआरए सदनिका हडप केली असल्याचा आरोप केला. 


महापौर पेडणेकर जाधव यांच्या निवासस्थान परिसरात 


आयकर विभागाने आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांच्या निवासस्थान परिसरात भेट दिली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करण्यासाठी मी याठिकाणी आले आहे. शिवसैनिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यासाठी आले असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची सत्ता नाही तिथे सर्वांना त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना आम्ही घाबरून जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha