Bharat Jodo in Maharashtra: भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi)  अनेकांना भेटत आहेत. महाराष्ट्रात त्यांचं आगमन झाल्यापासून ते लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. या दरम्यान काल राहुल गांधी यांनी सर्वेश हाटणे आणि चंद्रकांत किरकन या दोन लहान मुलांना भेटून त्यांचा प्रश्न जाणून घेतला होता. त्यावेळी एकाला सॉफ्टवेअर इंजिनियर तर एकाला डॉक्टर व्हायचंय असं स्वप्न राहुल गांधींना सांगितलं होतं. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते लॅपटॉप घेऊ शकत नाहीत. तसेच शाळेत संगणकही नसल्याचे  सांगितल्यानंतर काल सर्वेश हातनेला आणि आज चंद्रकांत किरकन या दहावीतल्या विद्यार्थ्याला राहुल गांधींकडून लॅपटॉप देण्यात आला आहे. 


हे दोघेही लोहा तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी असून दहावीत शिकत आहेत. आज चंद्रकांत किरकन याला नाना पटोले यांच्या हस्ते हा लॅपटॉप देण्यात आला. 






भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलाला राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लॅपटॉप भेट दिला होता. मोठं होऊन काय बनायचंय असं राहुल गांधींनी विचारल्यावर सर्वेशनं सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचंय असं सांगितलं होतं. मात्र आजवर कॉम्प्युटर पाहिलाय का? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. त्याला त्याने नाही असं उत्तर दिलं होतं. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाला लॅपटॉप  भेट देण्यात आला. कालच्या सभेतही राहुल गांधींनी या मुलाचा उल्लेख केला होता..


भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजिनियर व्हायचे बोलून दाखवले. पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला लॅपटॉप भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 


संबंधित बातम्या :


Bharat Jodo Yatra:  'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका चिमुकलीसोबत गप्पा मारताना राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'खूप क्यूट'!