Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर (Crime) अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) कंबर कसली असून त्याचा प्रत्यय पहिल्याच आठवड्यात आला आहे. नाशिक ग्रामीणला लाभलेल्या नव्या अधीक्षकांनी गुन्हेगारांना इंगा दाखविण्यास सुरवात केली असून पहिल्याच आठवड्यात दोन ते तीन घरफोड्यांचा निकाल लावला असून सहा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नात्यामुळे ग्रामीण अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी नाशिकमध्ये येताच कारवाईचा धडाका सुरु केला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी नित्याची झाली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसानं प्रशासन हरेक प्रकारे प्रयत्न करत असताना गुन्हे कमी होण्याचे नाव नाही. उलट छोट्या मोठ्या चोऱ्या, मारहाण, हल्ला, घरफोडी आदी घटना राजरोसपणे घडत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव देखील मेटाकुटीला आला आहे. अशातच आता नाशिक ग्रामीणच्या अधीक्षक पदी शहाजी उमाप रुजू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या उमाप यांनी कारभार समजून घेत लागलीच गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्याच कारवाईत जवळपास दहा संशयितांना ताब्यात घेतले असून दोन मोठ्या घरफोड्यांचा निकाल लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावातील दरोडा प्रकरणातील सात दरोडेखोरांना पकडण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले आहे. हे सराईत दरोडेखोर असून त्यांच्यावर यापूर्वी जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान 24 ऑक्टोबरला नांदूर शिगोटेत राहणाऱ्या संतोश कांगणे आणि रमेश शेळके यांच्या घराचे दरवाजे तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत लोखंडी पहार आणि चाकुचा धाक दाखवत घरातील सदस्यांना काठीने मारहाण करून लाकडी बेडमध्ये ठेवलेले सुमारे 139 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकुण 6 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता दरम्यान संशयितांचा शोध सुरु असतांनाच बारामतीहून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
9 लाख 2 हजार 445 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हयातील घटनास्थळावर मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दरोड्यातील संशयितांचा माग सातही संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलला सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, गंठन, पेंन्डल, कानातले वेल, सोन्याची छैन, अंगठी, डोरले, नथ, झुबे, पोत असे एकुण 127 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत रुपये 5 लाख 69 हजार, 970 रुपयांसह ८ मोबाईल फोन, 5 मोटर सायकल असा एकुण 9 लाख 2 हजार 445 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिन्नरमध्ये तिघांना अटक
सिन्नर तालुक्यात वाढलेल्या घरफोड्या, चोऱ्याचे गुन्हे उघडीस आणण्याच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मागील तीन-चार महिन्यात झालेल्या घरफोड्या, चोऱ्या यामध्ये संशयित विनोद राजू पवार, पापड्या उर्फ अक्षय भाऊसाहेब जाधव, आदित्य दशरथ माळी या संशयितांना अटक करण्यात आली आहे. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका नगर, कानडी मळा, मंगलमूर्ती हाइट्स सरदवाडी रोड, वृंदावन नगर, अटकवाडे, सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सुळेवाडी या ठिकाणी घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सहा चोऱ्यांमधील एकूण चार लाख 2 हजार 476 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.