Maharashtra Kustigir Parishad 2022: भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नव्यानं निवडणूक घेऊन खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन बॉडी तयार करण्यात आली.त्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात पुण्यात आयोजित कुस्ती स्पर्धांना आयोजित करण्यासाठी बाळासाहेब लांडगे आणि रामदास तडस या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. दरम्यान,  न्यायालयानं काल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीच्या निर्णयावर स्थगितीचा निकाल दिला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी प्रतिक्रिया दिलीय. 
 
बाळासाहेब लांडगे काय म्हणाले?
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेलाच राहणार आहे. आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुस्तीगीर परिषदेच्यावतीनं घोषीत केलं जाईल. आमच्याकडे ज्या सलग्न संस्था (५ जिल्ह्यातील) असतील त्यांना आम्ही घेऊन स्पर्धा आयोजित करणार आहोत. 70 वर्षांपासून ही संस्था सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय यांचे मी आभार मानतो की त्यांनी जी काही कारवाई या परिषदेवर केली ती फेटाळून लावली. वकील तुषार पवार यांनी हा खटला लढवला.  त्यांचे आभार मानतो, असं बाळासाहेब लांडगे म्हणाले आहेत.  दरवर्षी  ही परिषद महाराष्ट्र केसरी यांसारख्या अनेक स्पर्धेचं आयोजन करते. पण कोरोनामुळं या स्पर्धांना पूर्णविराम लावण्यात आला. आम्हाला जो निधी दिला, त्याबद्दल आमच्या बद्दल खोट्या तक्रारी काही मंडळींनी केली. त्यानंतर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने आमच्या संघटनेवर बंदी घातली. यानंतर आम्ही कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा अधिकार आमच्याकडेच असणार आहे, असंही बाळासाहेब लांडगे यांनी म्हटलंय.


खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब लांडगे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. महासंघाकडून ज्या ज्या वेळेस राष्ट्रीय स्पर्धा घेण्याची मागणी होत होती. परंतु, त्यावेळी स्पर्धा घेण्यात आल्या नाही. बाळासाहेब लांडगे यांनी चाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळं बॉडी बरखास्त करण्यात आली. त्यावेळी तीन राज्याच्या बॉडी बरखास्त करण्यात आला. ज्यात हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याचा समावेश होता.यानंतर नव्यानं निवडणूक घेण्यास सांगितल्या गेल्या. या निवडणुकीत आम्ही आणि राज्यातील सर्व पैलवान एक झालो. अध्यक्षपदांच्या निवडणुकीत माझी बिनविरोध निवडून आलो. परंतु, ते कोर्टात गेले आणि त्यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर न करण्यास सांगितलं. यामुळं आम्ही निवडणुकीचा निकाल जाहीर केला नाही. परंतु, कालच्या निवडणुकीत कार्टानं जुन्याच बॉडीला महत्व दिलं. ही महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांची खरी लढाई आहे. महासंघानं सांगितलं की हे आमच्या अधिपत्याखाली येते. कोर्टानं सांगितलं की बॉडी बरखास्त करू शकत नाही. त्यामुळं आता हा वाद सुप्रीम कोर्टात गेला असून सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो निर्णय सर्वांना मान्य असेल.


हे देखील वाचा-