नांदेड : भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलाला राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लॅपटॉप भेट दिला आहे. मोठं होऊन काय बनायचंय असं राहुल गांधींनी विचारल्यावर सर्वेशनं सॉफ्टवेअर इंजिनीअर बनायचंय असं सांगितलं होतं. मात्र आजवर कॉम्प्युटर पाहिलाय का असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. त्याला त्याने नाही असं उत्तर दिलं आज राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाला लॅपटॉप भेट देण्यात आला आहे... कालच्या सभेतही राहुल गांधींनी या मुलाचा उल्लेख केला होता..
भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला लॅपटॉप भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
देशातल्या प्रत्येक मुलाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. परंतु भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो मुले कोरोना काळात संगणक नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. भारत जोडो यात्रा अशा स्वप्नांना मुर्त रुप देण्याचे काम करत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता परदेशी नागरिकही सहभागी होत असल्याचे पाहायला मिळतंय. लंडनमधील काही जण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. डॅा. सुबोध कांबळे आणि ॲडव्होकेट भारुलता हे दाम्पत्य थेट इंग्लंडहून नांदेड जिल्ह्यात आले आणि आज त्यांना राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याची संधी मिळाली. सुबोध मूळचे महाराष्ट्रीयन आहेत तर भारुलता गुजराती. कांबळे दाम्पत्य 20 वर्षापासून इंग्लंडमध्ये व्यवसाय करतात.
चिमुकलीसोबत केलेले राहुल गांधींचे संभाषण व्हायरल
भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडमध्ये असताना एका चिमुकलीसोबत केलेले संभाषण सध्या सोशल मीडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी तिला भविष्यात काय व्हायचंय? तसेच तिच्याशी संबंधित अनेक प्रश्नांची विचारणा करतात? त्यावेळी या मुलीने दिलेली उत्तरे नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.
संबंधित बातम्या :