एक्स्प्लोर

निवृत्तीनंतर वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांना एक वर्षाची मुदतवाढ

वादग्रस्त अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षासाठी करारपद्धतीने ही नेमणूक असेल. राधेश्याम मोपलवार हे आज शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र वादात सापडलेल्या मोपलवारांना समृद्धी महामार्गाच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : वादग्रस्त अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षासाठी करारपद्धतीने ही नेमणूक असेल. राधेश्याम मोपलवार हे आज शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र वादात सापडलेल्या मोपलवारांना समृद्धी महामार्गाच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांची एक कथित सीडी उघड झाली होती. ज्यात मोपलवार एका इमारतीच्या बांधकामावरुन सेटलमेंट करत असल्याचं दिसत होतं. हे प्रकरण उघड झाल्यानंतर मोपलवार यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आली होतं. चौकशीनंतर मोपलवार यांना सरकारने क्लीन चिटही दिली आणि मोपलवार 26 डिसेंबर 2017 ला पुन्हा सेवेत रुजूही झाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची कामं अंतिम टप्प्यात असल्याने ती पूर्ण करण्यासाठी मोपलवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख शासनाच्या नियुक्ती पत्रात करण्यात आला आहे . काय आहे नेमकं प्रकरण? सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प एका नव्या वादात सापडला होता. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले होते. ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा होता. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे. मोपलवारांची कारकीर्द वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली. मोपलवारांचं स्पष्टीकरण ”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं होतं. संबंधित बातम्या कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपनंतरही मोपलवार पुन्हा सेवेत रुजू एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’? ‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’ राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर  मोपलवार प्रकरणावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर घणाघात मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Kailas Patil: चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवक फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget