एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेवरुन विखे-पाटील भडकले, म्हणाले वाचाळपाणा कराल तर...

Radhakrishna Vikhe Patil: उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे.

Radhakrishna Vikhe Patil: उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्यामुळे त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपाणा कराल तर एकटे पडाल, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलढण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतलाय..

जनाची नाही, मनाची तरी ठेवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलढाणा येथील सभेत केली होती. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांनी बोलताना भान ठेवायला हवे. ते एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. सत्ता गेल्याचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. आपण जे बोलतोय त्याचे भान त्यांना नाहीए. अडीच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतक-यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पुर्तता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना अगोदरच दिल्या आहेत. आपण मात्र बांधावर जाऊन वीज कापण्याचं काम केलंय. पातळी सोडून जर वाचाळपाणा करत राहीले तर भविष्यात ते एकटेच राहतील असा टोला विखे पाटलांनी लागवलाय...

गेल्या अडीच वर्षात सरकार नावाची व्यवस्थाच राज्यात शिल्लक नव्हती. कोविडमध्येही लोक वा-यावर होते. नंतरही कुठली मदत नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसता तर राज्याची अवस्था काय झाली असती? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी वास्तवाचं भान ठेवायला हवं, असा सल्ला विखे पाटलांनी शेतकरी आत्महत्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना दिलाय..
 
मुख्यमंत्र्यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेलं आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होतं. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेलं आहे. पुढची वीस वर्ष शिंदे फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहणार असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय..

वाळू माफियांकडून जिवीताला धोका असल्याने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केलीये. याची गंभीर दखल घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील वाळू तस्कर आणि खानमाफीयांवर लगाम लावलाय, म्हणून काही आमदारांचाही थयथयाट झालाय. वाममार्गाने पैसा मिळवून त्याचा उपयोग जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी होतोय. बीडच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून वेळप्रसंगी मोक्का लावला तरी हरकत नाही अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिलीये...

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget