मनोज जरांगेंच्या भेटीबाबत काहीही चर्चा नाही, विखे पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले, चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
Radhakrishna Vikhe Patil : येत्या 29 ऑगस्टपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. हजारो आंदोलकांसह ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे मुंबईत आल्यास तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत खुद्द विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं आहे.
चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे
दरम्यान, चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे असेही विखे पाटील म्हणाले. त्यांची तयारी असेल तर आम्ही देखील तयार असल्याचे विखे पाटील म्हणाले. मात्र त्यासाठी दोन्हीही बाजूने समन्वय झाला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय करायचा आहे. शासनाची यात कुठलीही भूमिका नाही. सरकारनं यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही असे विखे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी पण...
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची (Mumbai Police) सशर्त परवानगी दिली आहे. 29 तारखेला केवळ एकच दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मनोज जरांरे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वे ने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांना आझाद मैदानापर्यंत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्याने मैदानाच्या क्षमतेनुसार केवळ 5000 आंदोलकांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पूर्व परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार नाही
महत्वाच्या बातम्या:
























