एक्स्प्लोर
नीरव मोदीला सरकारचाच राजाश्रय, विखे पाटलांचा आरोप
ललित मोदी आणि नीरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच रुपं असून राजाश्रयामुळेच नीरव मोदी 11 हजार कोटी रुपये घेऊन पळाल्याची टीका माजी खासदार नाना पटोले यांनी केली.
जालना : पैसा बँकेत ठेवावा, तर नीरव मोदीची भिती आणि पैसा घरात ठेवावा, तर नरेंद्र मोदींची भिती, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नीरव मोदी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. तसेच, नीरव मोदींना मोदी सरकारचाच राजाश्रय असल्याचा आरोपही विखेंनी केला.
नीरव मोदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले असून त्याला मोदी सरकारचा राजाश्रय असल्यामुळेच तो परदेशात पळून गेला, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
ललित मोदी आणि नीरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच रुपं असून राजाश्रयामुळेच नीरव मोदी 11 हजार कोटी रुपये घेऊन पळाल्याची टीका माजी खासदार नाना पटोले यांनीही केली.
तसेच, आपल्या बगलबच्च्यांना बँका लुटण्यासाठी मोकळं ठेवण्याचं काम नरेंद्र मोदी करत असल्याची टीका देखील पटोले यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement