एक्स्प्लोर
हिंजवडीत महिला आयटी इंजिनिअरची हत्या, सुरक्षारक्षक ताब्यात
पुणे: हिंजवडीमध्ये एका एका आयटी महिला इंजिनिअरची हत्या झाली आहे. रसिला ओपी असं हत्या झालेल्या 23 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळची केरळची रहिवाशी आहे.
हिंजवडीतील फेज 2 मधील एका प्रसिद्ध आयटी कंपनीच्या इमारतीत मृतदेह आढळला.
रसिला ही रविवारी सुट्टी असताना कामानिमित कंपनीत आली होती. रसिलाचं एका प्रोजेक्टसंदर्भात दुसऱ्या राज्यातील सहकाऱ्याशी ऑनलाईन बोलणंही झालं
दरम्यान, रसिलाच्या गळ्याला गुंडाळलेली केबल आढळली. दुपारी कंपनीत आलेल्या रसिलाची संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
कंपनीत हत्या झाल्यानं सुरक्षा रक्षकानं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मूळचा आसामचा असलेल्या भाबेन सैल्किया या 26 वर्षीय सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.
मूळची केरळची असलेली रसिला ही 2015 पासून हिंजवडीत कार्यरत होती. हत्येचा छडा लावण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement