(Source: ECI | ABP NEWS)
पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? माहापालिका निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवार बड्या नेत्याच्या घरी
पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Pune : पुणे (Pune) जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत वाघेरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर संजोग वाघेरे पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता महापालिका निवडणुक (Mahapalika Election) तोंडावर असतो राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी थेट संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या भेटीमुळे संजोग वगैरे पुन्हा राष्ट्रवादीत (NCP) घर वापसी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे संकेत पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्याआधी ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजय वाघेरे हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
पार्थ पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय
पार्थ पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय झाले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत आहेत. या माध्यमातून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते, पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. शहरातील पकड अधिक मजबूत करण्यासाठी भेटीगाठी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. या भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी शहरातील कार्यकर्त्यांशी आणि प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागावर पुन्हा एकदा मजबूत पकड मिळवण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याचे बोललं जात आहे.
2024 ची लोकसभा निवडणूक त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली होती
संजोग वाघेरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मावळमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर, 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून पिंपरी-चिंचवडमधून निवडणूक लढवली. त्यामुळं राजकीयदृष्ट्या ते उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक महत्त्वाचे नेते आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Shivsena UBT: ठाकरे गटाचा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर? विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभाला हजेरी; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

























