एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : जेव्हा पवार गोलंदाजी आणि चव्हाण फलंदाजी करतात!
महाराष्ट्राचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि आम्हाला हातात हात घालून काम करावं लागेल, हे सांगायला शरद पवार विसरले नाहीत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल (26 नोव्हेंबर) पुण्यात क्रिकेटचा आनंद लुटला. महत्त्वाचं म्हणजे मैदानात उतरुन पृथ्वीराज चव्हाणांनी फलंदाजी तर शरद पवारांनी चक्क गोलंदाजी केली.
पुण्यातील तळजाई टेकडी इथल्या सदू शिंदे खुल्या स्टेडियमचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते.
उद्घाटनानंतर या दोन्ही नेत्यांनी क्रिकेटचा आनंद अनुभवला. शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाणांना एकही फटका लगावता आला नाही. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हातात घेतला, पण पवार फलंदाजी करण्याचं टाळलं. यावेळी मैदानावरील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, महाराष्ट्राचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि आम्हाला हातात हात घालून काम करावं लागेल, हे सांगायला शरद पवार विसरले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement