एक्स्प्लोर

पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर, पाणीपट्टीत वाढ होण्याची चिन्हं!

पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. पण पुण्याच्या महापालिका प्रशासनासाठी मात्र उत्पन्नची साधनेच उणे पडत आहेत. अशा स्थितीमध्ये पालिका आयुक्त सौरभ राव आज महापालिकेचं प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करणार आहेत. यामध्ये नागरिकांवर कराचा बोजा पडणार असल्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत.

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे आज त्यांच्या कार्यकाळातील पहिलंच 2019-2020 वर्षासाठीचं पालिकेसाठीचे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करणार आहेत. मागच्या वर्षी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 5,397 कोटींचे पालिकेचे अंदाजपत्रक मांडलं होतं. यामध्ये या प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला होता.
पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रस्तावित केलेले प्रकल्प
1) सुलभ आणि पदपथ विकसित करणे, शहरी एकात्मिक सायकल आराखड्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर विकसन आणि पब्लिक बायसिकल शेअरिंग व्यवस्था निर्माण करणे, पीएमपीएमएल सार्वजनिक वाहतुक यांसारख्या वाहतूक व्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांसाठी 563  कोटींची तरतूद केली होती.
2) रस्ते विकास आणि शहरात विविध ठिकाणी पूल बांधण्यासाठी 401.55 कोटींची तरतूद
3) सुनियोजित आणि समान पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 492.46 कोटी तरतूद
4) पर्यावरण आणि शाश्वत विकाससंबंधी प्रकल्पांसाठी 309 कोटींची तरतूद
5) घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी 87 कोटींची तरतूद
कागदोपत्री हे प्रकल्प चांगले वाटत असले तरीही या सगळ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी निधी उभारायचा कुठून हा एक मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर होता. पालिकेचं उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा याचा ताळेबंद बसवणं हा एक मोठा प्रश्न तेव्हाचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर होता आणि आताचे आयुक्त सौरभ राव यांच्यासमोरही असणार आहे.
2017-2018 सालमध्ये महापालिकेसाठी जमेचे उद्दिष्ट 5912 कोटी रुपये होते. मात्र डिसेंबर 2017 च्या अखेर 3163 कोटीच जमा झाले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन 2018-2019 सालाच्या अंदाजपत्रकात हे 5397 कोटींचं सादर करण्यात आलं आणि उत्पन्नासाठी मिळकतकर आणि वस्तू-सेवा करावर भिस्त ठेवण्यात आली. या प्रमाणात पालिकेचं उत्पन्न कसं वाढवायचं हा एक प्रश्न आहेच. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी कुणाल कुमार यांनी मालमत्ता करामध्ये 15 टक्के वाढ सुचवली होती. या वाढवलेल्या करामधून 135 कोटींचा जास्तीचा महसूल गोळा होईल अशी अपेक्षा होती. पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सौरभ राव यांनी अंदाजपत्रकाच्या आधीच्या बैठकांमध्ये नागरिकांवर बोजा पाडणाऱ्या कर वाढीचे पर्याय सुचवलेत असं खुद्द पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, येणाऱ्या वित्तीय तुटीबाबतीत विरोधकांनी मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
महापालिकेची खालावत जाणारी आर्थिक स्थिती, शहराच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि पुणेकरांच्या प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा याचं गणित सौरभ राव कसं बसवतात याची उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Ganesh Naik on Eknath Shinde: बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget