एक्स्प्लोर

पुण्यात हत्या झालेल्या तरुणाच्या सांगाड्यावर 17 वर्षांनी अंत्यसंस्कार

2002 मध्ये सोळा वर्षांचा असताना निखिल रणपिसेची हत्या झाली होती. त्यानंतर पोलिसांकडे राहिलेल्या त्याच्या सांगाड्यावर 17 वर्षांनी अंत्यसंस्कार झाले

पुणे : पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात मानवी सांगाडा सापडला. तब्बल सतरा वर्ष हा मानवी सांगाडा मुद्देमाल कक्षात होता. अखेर सतरा वर्षांनी या मानवी सांगाड्यावर पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले. निखिल रणपिसे या तरुणाचा हा सांगाडा होता. 2002 मध्ये सोळा वर्षांचा असताना निखिलची हत्या झाली होती. 2002 मध्येच त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एमआयटी कॉलेज मागील टेकडीवर पोलिसांना सापडला. पण हा सांगाडा कोणाचा आहे हे त्यावेळी पोलिसांना माहीत नव्हते. 2004 मध्ये या सांगाड्याबाबत उलगडा झाला. दुसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींनी निखिलच्या खुनाची कबुली दिली. त्याचा मृतदेह एमआयटी कॉलेज मागे टाकल्याचं सांगितलं. त्यावरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2006 मध्ये त्याचा निकाल लागला. आरोपी निर्दोष सुटले, मात्र निखिलचा सांगाडा पोलिसांकडे राहिला तो राहिलाच. पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पोलिस स्टेशन आधुनिक करण्याची मोहीम हाती घेतले. त्यात मुद्देमाल कक्षाचीही सफाई हाती घेण्यात आली. त्यावेळी एका बॉक्समध्ये ठेवलेला निखिलचा सांगाडा समोर आला. खोलीतील सामान हलवायला आलेले पोलिस कर्मचारी सांगाडा पाहून चक्रावलेच. त्यांनी लगेच वरिष्ठांना या खोक्याची माहिती दिली. त्या खोक्यावर खटला क्रमांकही लिहिला होता. खटला क्रमांकाच्या आधारे हा सांगाडा कोणाचा आहे याचा शोध लावण्यात आला. पोलिसांनी सर्व नोंदी/दफ्तर तपासात या मानवी सांगाड्याचा शोध घेतला. त्यात हा सांगाडा निखिलचा असल्याचं स्पष्ट झालं. त्यामागची कहाणी ही पुढे आली. कशी झाली हत्या? 2002 मध्ये एमआयटी कॉलेजमागील टेकडीवर काही दिवसांपासून कुजणारा मृतदेह मिळाला होता. दोन वर्ष शोध घेतल्यानंतर तो निखिल रणपिसे नावाच्या 16 वर्षांच्या तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं होतं. लगेच त्याच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली होती. निखिलचा त्याच्याच दोन मित्रांनी खून केला होता. निखिलच्या एका नातेवाईकाच्या घरी त्यांनी चोरी केली होती. पण पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्यामुळे त्याच्या दोन मित्रांनी त्याचा खून केल्याची बाब समोर आली होती. जेव्हा हा खटला बंद करण्यात आला तेव्हा कोर्टाने पोलिसांना निखीलच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करा असे निर्देश दिले होते. पण तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि तो सांगाडा तसाच खोक्यात पडून राहिला. पोलिसांनी पुन्हा निखिलच्या पालकांचा शोध घेतला. ते सापडले देखील. मात्र वयोमान आणि आजारपण यामुळे ते हा सांगाडा ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ होते. पण अंत्यसंस्कार करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पोलिसांनी पालकांच्या मान्यतेने आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडत अंत्यसंस्कार केले.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Mayor Bungalow: रितू तावडेंचा राजालाही लाजवेल असा थाट, महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी थांबेना, 3 कोटींचं नवं टेंडर काढलं
रितू तावडेंचा राजालाही लाजवेल असा थाट, महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पैशांची वारेमाप उधळपट्टी थांबेना, 3 कोटींचं नवं टेंडर काढलं
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Embed widget