एक्स्प्लोर
पुण्यात पहाटे तरुणीचा विनयभंग, मित्राला मारहाण, दोन्ही आरोपी जेरबंद
रविवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलमधून मित्राकडे जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे

पुणे : पुण्यात तरुणीचा विनयभंग करुन तिच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास बाणेर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित तरुणी ही शिक्षिका आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. रविवारी पहाटे ती एका हॉटेलमधील पार्टीतून मित्राकडे दुचाकीवर जात होती. यावेळी दोघा तरुणांनी पाठलाग करुन तरुणीला मारहाण केली. VIDEO | पुण्यात तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण एका सोसायटीजवळ हा प्रकार घडत असताना तरुणीने मित्राला बोलावलं. त्यानंतर आरोपींनी तरुणीसह मित्रालाही बेदम मारहाण केली. यावेळी आपला विनयभंग केल्याचा दावा तरुणीने केला आहे. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहेत. या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आलीय. दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Before You Go
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















