एक्स्प्लोर

पुणे: कार पेटली नाही, तर एकतर्फी प्रेमातून आत्मदहन !

पुणे: हडपसरमधील कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नव्हता तर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या केली.   काय आहे प्रकरण?   हडपरच्या गाडीतळाजवळ धावत्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने कार चालक अजित आत्माराम इंगळेचा होरपळून मृत्यू झाला होता. ग्लायडिंग सेंटरजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती.   संबंधित मारुती व्हॅन ही गॅसकिटवर चालणारी असल्यामुळेच कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.   मात्र अधिक तपासानंतर अजितने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.   गाडीत कोंडून घेऊन आत्मदहन   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाबाबत तरुणीच्या घरच्यांना विचारले होते. परंतु कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यानंतर या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत 20 डिसेंबर 2015 रोजी लग्न झाले होते. तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिने इंगळेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने पुन्हा तिचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. तरुणीशी पुन्हा संपर्क साधून त्याने लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्याच्याशी लग्न न केल्यास घरासमोर आत्महत्या करण्याची तो धमकी देत होता.   गुढी पाडव्याच्या सणासाठी ही तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच इंगळे फलटणवरुन एक मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तिच्या घरासमोरील रस्त्याच्या दुस-या बाजूला मोटार उभी केली. मोटारीच्या काचा बंद केल्यानंतर त्याने दरवाजे लॉक करुन घेतले. मोटारीमध्येच त्याने स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकली. या आगीत अजित इंगळेचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी

पुण्यात व्हॅन पेटल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी

Embed widget