Pune ATS New : दहशतवाद्याचं रत्नागिरी कनेक्शन! दहशतवाद्यांचा फंड मॅनेज? पुणे एटीएसकडून चौथ्या आरोपीला अटक
पुणे एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अल सुफा संघटनेशी संबंधित असलेल्या चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Pune ATS New : पुणे एटीएसकडून चौथ्या आरोपीला अटक (ATS) करण्यात आली आहे. अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी रत्नागिरीचा असून त्याला काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. 28 जुलै रोजी चौथ्या आरोपीला अटक केली असून त्याला 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा आरोपी या आतापर्यंत पकडण्यात आलेल्या सगळ्या आरोपीचा फंड मॅनेजर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चोरीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी यांना 23 जुलैला अटक केली होती. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीवरून अबदुल कादीर दस्तगीर याला या दोघांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या सगळ्यांना पैसे पुरवणाऱ्या आता सिमाब नसुरुधिन काझी या चौथ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेला चौथा संशयित हा मूळचा रत्नागिरीचा आहे. सिमाब नसुरुधिन काझी हा आयटी इंजिनियर आहे. हाच पुण्यात आतापर्य़ंत अटक करण्यात आलेल्या तिघांच्या घराचं भाडं भरत होता. तो पुण्यातील कोंढव्यात राहायला होता. मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावचा आहे. सिमाब मूळ गावी गेला असताना त्याला पकडून आणण्यात आले आहे. सिमाब हा पैसे पाठवत होता. दोन ते तीन वेळा त्याने पैसे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी यांच्याकडून एटीएसने बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हे दोघे 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली होती. आता रत्नागिरीतून चौथ्या आरोपीला अटक करण्यात आले आहे.
जंगलात करायचे बाँम्बस्फोटाचा सराव...
पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी (NIA) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जावून बॉंब स्फोटांचा सराव केल्याच समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र - बेळगाव सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला देखील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते राज्यात विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे.
#UPDATE | Pune Suspected Terrorist Case | One more accused has been arrested from Ratnagiri by Maharashtra ATS in connection with this case. He has been arrested for allegedly giving financial assistance to the third absconding accused: Maharashtra ATS
— ANI (@ANI) July 29, 2023
हेही वाचा-