By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 14 Sep 2017 08:08 AM (IST)
नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जाहीर केली. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. 1000 रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. नोटाबंदीनंतर आयकर दात्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ नोटाबंदीनंतर आयकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाच ऑगस्टपर्यंत दोन कोटी 82 लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी आयकर भरला आहे. हे नोटाबंदीचं यश असल्याचा दावा सरकारने केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 25 टक्के इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांचे प्रमाण 2 कोटी 26 लाख इतके होते. यामध्ये यंदाच्या वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदा पाच ऑगस्टपर्यंत एकूण 2 कोटी 82 लाख 92 हजार 955 जणांनी आयकर भरला.पाच लाखांपेक्षा जास्त लोक आयकर विभागाच्या रडारवर
नोटाबंदीनंतर काळ्या पैशांचा छडा लावण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 31 जानेवारीपासून ‘स्वच्छ धन अभियान’ सुरु केलं. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख 92 हजार नागरिकांकडून आर्थिक ताळेबंदाची माहिती मागवण्यात आली. यातील 9 लाख 72 हजार नागरिकांनीच आर्थिक ताळेबंद सादर केला. उर्वरित नागरिकांच्या बँक तपशीलाची झडती आयकर विभागाकडून घेण्यात येत आहे. तर या अभियानाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यापासून सुरु झाला. या टप्प्यानंतर 5 लाख 56 हजार जणांच्या आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, यातील 1 लाख 4 हजार खातेदार हे ‘स्वच्छ धन अभियाना’च्या पहिल्या टप्प्यातील असल्याचं समोर येत आहे. ज्यांना खात्यातील जमा रक्कमेविषयी माहिती देता आली नव्हती. त्यांची ओळख पटवण्यातही आयकर विभागाला यश आलं आहे. त्यांच्यावर आयकर विभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संबंधित बातम्या नोटाबंदी : नफा, तोटा, सरकार-विरोधकांचे दावे, 10 महत्वाचे मुद्देविधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील येणार, 16 तारखेला विविध गावांना देणार भेटी
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय