एक्स्प्लोर
पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी सर्वप्रथम मसूद अजहरला संपवणे गरजेचे : कर्नल चंद्रचूड
कर्नल विजय चंद्रचूड म्हणाले, "आपल्याला जर त्यांना (दहशतवादी आणि पाकिस्तान) बिफीटींग रिप्लाय द्यायचा असेल तर मसूद अजहरला संपवणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना संपवणे हाच सर्वात मोठा उपाय आपल्याकडे आहे."
पुणे : पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर देशभरातून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. याबाबत निवृत्त कर्नल विजय चंद्रचूड म्हणाले, "आपल्याला जर त्यांना (दहशतवादी आणि पाकिस्तान) बिफीटींग रिप्लाय द्यायचा असेल तर मसूद अजहरला संपवणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना संपवणे हाच सर्वात मोठा उपाय आपल्याकडे आहे."
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून बदल्याची मागणी होत आहे. यासंदर्भात एबीपी माझाने निवृत्त कर्नल विजय चंद्रचूड यांच्याशी बातचीत केली.
चंद्रचूड म्हणाले की, "दहशतवाद हा आत्ताचा प्रश्न नाही. पुलवामासारखी घटना घडली की आपलं आणि सरकारचं हायपर सेन्सिटिव्ह होणं योग्य नाही. तसेच या प्रकाराला धर्माचा रंग देणंही योग्य नाही. आपल्याला जर त्यांना सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर मसूद अजहरला संपवणं आवश्यक आहे."
चंद्रचूड म्हणाले की, "बाय हूक ऑर क्रुक त्यांना संपवलं पाहिजे. आपण हे करु शकतो. अमेरिका किंवा इस्राईलने दुसऱ्या देशात जाऊन शत्रूला संपवलं. म्हणून आपणही तसंच करावं का? यासंबधी आपल्या हिताचा जो निर्णय असेल तो आता घेणं गरजेचं आहे. दहशतवादाला संपवण्यासाठी लष्कर पुरेसे नाही, सर्व यंत्रणांनी एकत्र येणं आवश्यक आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement