पंढरपूर : एकीकडे पोलीस बांधव कोरोना संकटाविरोधात लढत असताना दुसरीकडे नक्षली कारवायांना उत आला आहे. आज (17 मे 2020) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पोरयकोटी-कोरपर्शी जगंलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि एक सी-60 पथकाचा जवान शहीद झाला आहे. या घटनेत तीन जवान जखमी झाले आहेत. धनाजी होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावचे सुपुत्र आहेत. याची माहिती समजताच पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली.


पुळूज या त्यांच्या गावाला धक्का बसला आहे. अतिशय हुशार आणि कर्तबगार अशी ओळख असलेल्या पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हा पुळूजचा सुपुत्र होता. पहिल्यापासून पोलीस दलात जाण्याचे स्वप्न बघितलेल्या धनाजी यांची पोस्टिंग नक्षलवादी भागात झाली होती.

दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा गोळीबार
आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलीस उपनिरीक्षक धनाजी होममाने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक होममाने हे सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील आहे. विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षल ठार झाला नाही. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

ट्रेन पकडण्यासाठी दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन महिलेची धाव; महिला पोहोचेपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबून

तीन महिन्यापूर्वी झाला होता साखरपुडा
संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे थांबले असताना गडचिरोलीत नक्षल्यांशी मुकाबला करताना दोन विरांनी आहुती दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद धनाजी होनमाने हे शेतकरी कुटुंबातील आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ त्यांची शेती आहे. तीनच महिन्यापूर्वी धनाजींचा साखरपुडा गावातील एका मुलीसोबत झाला होता. धनाजींना एक छोटा भाऊ असून तो उच्च शिक्षण घेत आहे, तर आई-वडील शेती करतात. दरम्यान, काही दिवसांनी धनाजीचा विवाह होता. मात्र, त्याआधीच धनाजीला विरमरण आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Migrant Workers | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रच्या सीमेवर काय परिस्थिती? स्थलांतरितांच्या काळीज हेलावणाऱ्या कहाण्या