लातूर : गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 11 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यामुळे उदगीर शहर कोरोनामुक्त होणार याबाबत जिल्हा प्रशासन आशादायी असतानाच शनिवारी अचानक दहा रुग्णांची भर पडली आहे. तर आज दुपारी एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.


जिल्ह्यात एकट्या उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात 49 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 41 रुग्ण हे फक्त उदगीर तालुक्यात आढळून आले असून पैकी एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे तर 21 जण हे कोरोनामुक्तही झाले आहेत. सध्या सामान्य रुग्णालयात 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात आजच्या दहा लोकांचा ही समावेश आहे. शनिवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उदगीर शहरातून 17 नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उदगीरकारांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 29 मे पर्यंत उदगीर शहरात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. उदगीर शहर वगळता इतरत्र एकही रुग्ण नसला तरी उदगीर शहरातील आकडेवारी चिंतेची बाब आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यातील निलगा येथे आठ परराज्यातील प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले होते. ते उपचारानंतर कोरोनामुक्त झाले होते.


जिल्ह्याची आकडेवारी


एकूण रुग्ण -  49
बाधित रुग्ण उपचार सुरू -  18
बरे झालेले रुग्ण - 29
मृत्यू - 02


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. केंद्राच्या गाईडलाईन्स आल्यावरच चौथा लॉकडाऊन कसा असेल याबाबत सविस्तर माहिती कळणार आहे.


संबंधित बातम्या :






Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनचं काटेकोर पालन करा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद