एक्स्प्लोर

महानगरांमध्ये डाळी शंभरीत कुणामुळे?

कांद्याच्या दरवाढीनंतर डाळींच्या किंमतीही वाढणार असल्याची माहित समोर येत होती. मात्र बाजारपेठेत बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जातात. राज्याच्या काही भागात दुष्काळ होता, तर यावर्षी त्याठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटून सर्व डाळींचे भाव वाढणार आहेत, असा प्रचार सुरु होता.

उस्मानाबाद : लातूरमध्ये तूरडाळ 80 ते 85 रुपये किलो, पुण्यात 120 रुपये किलो आणि नवी मुंबईत 90 ते 100 रुपये किलो. तूरडाळीच्या किरकोळ दराबाबात तीन वेगवेगळ्या शहरातल्या तीन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी दिलेली ही माहिती. या माहितीतल्या विरोधाभासामुळे, शहरातल्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांचा खिसा कापला जातोय हे अधोरेखित केलं आहे. डाळींची आवक सुरळीत आहे की कमी झाली आहे? डाळींचे दर खरंच वाढले आहेत की जाणूनबुजून वाढवण्यात आले आहेत? या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी, आम्ही डाळींच्या पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असलेली लातूर कृषी उत्पन्न समितीच्या व्यापाऱ्यांनाच विचारलं. कांद्याच्या दरवाढीनंतर डाळींच्या किंमतीही वाढणार असल्याची माहित समोर येत होती. मात्र बाजारपेठेत बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जातात. खरंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक सुरु झाली की शेतमालाचे भाव पडायला सुरुवात होते, हा आजवरचा इतिहास आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळ होता, तर यावर्षी त्याठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटून सर्व डाळींचे भाव वाढणार आहेत, असा प्रचार सुरु होता. प्रत्यक्षात डाळींचे दर वाढण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या फक्त उडीद डाळ शंभरी पार गेली आहे. तुरीचे दर 95 रुपयांवरुन घसरुण 85 रुपयांवर आले आहेत. तूर हातातून गेली म्हणून हिंगोली जिल्ह्यातल्या काही ठिकाणी शेतकरी तूर काढून टाकत आहेत. तुरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेंगा भरल्या नाहीत. हे चित्रं एकीकडे तर दुसरीकडे लातूर जिल्ह्याच्या काही भागात तुरीचं पीक उत्तम आलं आहे. लातूरची बाजार समिती ही डाळींसाठी देशात नंबर वन. इथल्या नितीन कलंत्रींचा तूरडाळींचा ब्रॅण्ड हा देशातला सर्वात मोठा ब्रॅण्ड आहे. नितीन यांच्याकडे 80 ते 82 रुपये किलो दराने तूर हवी तेवढी उपलब्ध आहे. डाळी शंभरी पार, पावसाचा फटका बसल्याने येत्या काळात डाळींच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता मागील सहा महिन्यापासून बाजारात हरभरा डाळ 55 ते 60 रुपये किलो, मसूर डाळ 55 ते 60 रुपये किलो, तूरडाळ 80 ते 85 रुपये किलो, मूगदाळ 90 रुपये किलो दराने मिळत आहे. फक्त उडीद डाळीने शंभरी ओलांडली आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी उडीद पेरायचा असतो त्यावेळी महाराष्ट्रात पाऊस नव्हता. मध्यप्रदेशात उडदाचा चांगला पेरा होता. पण तिथे अतिपाऊस झाला. बाजारपेठेत बऱ्याच वेळेला गैरसमज पसरवले जातात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक सुरु झाली की शेतमालाचे भाव पडायला सुरुवात होते हा आजवरचा इतिहास. शेतकऱ्यांच्या नव्या तुरी, हरभरा बाजारात येणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणेच भाव पडले आहेत. पण त्या आधीच अतिवृष्टी झाली, उत्पादन घटलं म्हणून सर्व डाळींचे भाव वाढणार अशी नवी मुंबईत अफवा उठवण्यात आली आहे. कांदा चार महिन्याचं पीक आहे. कांदा शेतात वाढण्याच्या काळात अतिवृष्टीने थैमान घातलं. म्हणून कांद्याने शंभरी पार केली. गृहिणींना कांद्यांचा भाव वाढल्याने डाळींचे भाव वाढले या आवईमुळे चिंता वाटू लागली आहे. डाळ                लातूर घाऊक बाजार          पुणे किरकोळ बाजार          नवी मुंबई किरकोळ बाजार हरभरा डाळ       रु. 55 ते 60/ किलो            रु. 100/ किलो                  रु. 80 ते 90/ किलो   तूर डाळ             रु. 80 ते 85/ किलो           रु. 120/ किलो                  रु. 90 ते 100/ किलो                                                                      मसूर डाळ          रु. 55 ते 60/ किलो           रु. 120/ किलो                   रु. 80 ते 90 /किलो उडीद डाळ        रु. 100/ किलो                  रु. 160/ किलो                   रु. 120 ते 130/ किलो मूग डाळ            रु. 90/ किलो                   रु. 120/ किलो                    रु. 100 ते 110/ किलो महानगरांमध्ये डाळी शंभरीत कुणामुळे?

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Embed widget