(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डाळी शंभरी पार, पावसाचा फटका बसल्याने येत्या काळात डाळींच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता
मराठवाड्यात आवकाळी पावसाने डाळींचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने किंमती वाढताना दिसत आहेत.
नवी मुंबई : कांद्याच्या दरांनी शंभरी पार केली असताना डाळीही कडाडल्या आहेत. डाळींनीही शंभरीचा टप्पा गाठला आहे. अवकाळी पावसाचा फटका कांद्यासह डाळींच्या पिकांना बसला आहे. सर्वच डाळींच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसात 20 ते 25 रुयांची वाढ झाली आहे. नवी मुंबंई एपीएमसी मार्केटमध्ये डाळींच आवक घटू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात डाळींचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पावसाने राज्यात थैमान घातल्याचा परिणाम कांद्यावर झाला तसाच तो डाळींवर सुद्धा झाला आहे. सर्वच डाळींच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. नवी मुंबंई एपीएमसी मार्केटमध्ये डाळींच्या आवकीत घट होवू लागली आहे. एपीएमसीमध्ये लातूर, नांदेड, परभणी , औरंगाबादमधून डाळींची आवक होत असते.
यावर्षी मराठवाड्यात आवकाळी पावसाने डाळींचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने किंमती वाढताना दिसत आहेत. सध्या डाळींच्या किंमती 100 रुपयांच्या वर गेल्या असून येणाऱ्या काळात या किंमती अजून वाढणार असल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान डाळींच्या किंमतीत वाढ झाल्याने महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात असून महिन्याचे बजेट बिघडल्याचे सांगितलं जात आहे.
डाळींच्या किंमती (प्रति किलो)
डाळी | घाऊक भाव | किरकोळ भाव |
तूरडाळ | 70 -90 | 90-100 |
मसूर डाळ | 60-70 | 80–90 |
चना डाळ | 60-70 | 80-90 |
उडीद डाळ | 110- 120 | 120-130 |
मटकी डाळ | 90-100 | 100-110 |
मूग डाळ | 90-100 | 110-110 |