एक्स्प्लोर
नगर-पुणे मार्गावर भीषण अपघात, आठ जणांचा जागीच मृत्यू
अहमदनगर-पुणे मार्गावर वाडेगव्हाणजवळील ही घटना आहे, ज्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु करण्यात आलं.

अहमदनगर : भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर – पुणे मार्गावर घडली आहे. अहमदनगर-पुणे मार्गावर वाडेगव्हाणजवळील ही घटना आहे, ज्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. या अपघातामध्ये 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शिरुर आणि पारनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. या अपघातामध्ये 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शिरुर आणि पारनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. आणखी वाचा























