एक्स्प्लोर
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मधील गुंतवणुकीचा आकडा म्हणजे धूळफेक : पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री एकाच खात्याबद्दल वेगवेगळी माहिती देत, जनतेला फसवत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पुणे : मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात 12 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मेक इन महाराष्ट्रमध्येही 14 हजार एमओयू झाले होते. तसंच मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री एकाच खात्याबद्दल वेगवेगळी माहिती देत, जनतेला फसवत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये 14 हजार एमओयू झाले होते, त्यापैकी केवळ 838 प्रकल्प कार्यान्वयित झाले. त्यासाठी 8 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात 6 हजार कोटींची गुंतवणूक झाली, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’बाबत आकडेवारी सादर करत, राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
“उद्योगमंत्री देत असलेली माहिती वेगळी आहे आणि मुख्यमंत्री ट्वीट करत असलेली माहिती वेगळी आहे. प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आता मॅग्नेटिक महाराष्ट्रमधे 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं म्हटलं आहे. ही धूळफेक आहे. लोकांना दिवास्वप्न दाखवणं सुरु आहे.”, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केल आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
- मेक इन महाराष्ट्रमध्ये 30 लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळेल, असं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात फक्त 42 हजार रोजगार निर्माण झाले.
- मेक इन महाराष्ट्रमधे झालेली गुंतवणूक कोणत्या गावात, कोणत्या कंपनीने आणि किती रकमेची केली याची माहिती सरकारने द्यावी आणि वेबसाईटवरही टाकावी.
- क्रिसेलच्या अहवालानुसार महाराष्ट्राचा विकासदर 7.3 टक्के आहे. मुख्यमंत्री करत असलेली वाढ गाठायला या वेगाने 2032 साल उजाडेल.
- महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सध्या जेवढा आकार आहे, तो पाहता मुख्यमंत्री दावा करत असलेली अर्थव्यवस्था व्हायला अडीचपट वाढ व्हावी लागेल.
- देशाचं वित्तीय केंद्र मोदींनी मुंबईहून गुजरातला पळवलं.
- हायपर लूप यंत्रणा राबवून पुणे-मुंबई अंतर 20 मिनिटांत पार केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement