एक्स्प्लोर

मुंबईत लोकलवरुन राजकारण; मुंबईकरांसाठी रेल्वे सुरु न केल्यास प्रवीण दरेकरांचा आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता.

मुंबई : लोकल सुरु करा नाही तर आंदोलन करू असा थेट इशारा भाजपनं सरकारला दिलाय. लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडलाय. पण येत्या महिन्यात लोकल सुरु झाली नाही तर लोकलवरून राजकीय मंडळी भिडणार असं चित्र निर्माण झालंय. राज्यात ट्रेन कधी सुरु करायची यावर अद्याप निर्णय झाला नाही.  नेत्यांमध्ये एकमत नाही, पण सामान्य माणूस यात भरडला जातोय.  

कधीही न थांबणारी लोकल कोरोनानं थाबंवली. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास बंद करण्यात आला. आता लोकल प्रवास कधी सुरू होणार, याची सर्वसामान्य वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सुरू करावी, असा सूर आता समाज माध्यमातून येऊ लागला आहे. आता विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरण्याची तयारी केलीय.  

काय म्हणाले प्रविण दरेकर?

ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांना रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा दिली नाही तर प्रत्येक स्टेशनवर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला आहे. आज लोक खुप लांबून टॅक्सी, प्रायव्हेट गाडीनं प्रवास करतात. ज्यामध्ये त्यांचे खुप पैसै खर्च होतात. आता हे सगळं सहनशक्तींच्या पलिकडे गेले आहे. त्यामुळे आठवड्याभरात निर्णय झाला नाही तर स्टेशनवर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले निर्बंध आता शिथिल होण्याची चिन्हे आहे. राज्यातील घटती रुग्णसंख्या, दुकाने, हॉटेल्सवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे हटवता येतील, याबाबतचा सविस्तर अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून, येत्या ऑगस्टपासून अमंलबजावणी होणार असल्याचं कळतंय. पण 70 टक्के लसीकरणाशिवाय लोकल सुरु करण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख म्हणत आहेत. 

आतापर्यंत किती लसीकरण झालं?

मुंबईत आतापर्यंत एकूण 67,72, 364 लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. पहिला डोस 57.63 टक्के लोकांनी घेतलाय. दुसरा डोस  17.60 टक्के लोकांनी घेतलाय. याच गतीनं लसीकरण होत राहीलं तर 70 टक्के लसीकरणाच्या अटीपर्यंत पोहोचायला अजुन किमान एक वर्ष तरी लागेल अशी शक्यता आहे 

  • पहिला डोस-  51,87,551 - 57.63%
  • दुसरा डोस-  15,84,813 - 17.60%
  • एकूण-  67,72, 364

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटिव्हीटी दर, बेड्सची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये  दुकानं, हॉटेल्स ट्रेन आणि इतर वेळ वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. पण येत्या महिन्यात लोकलवरून राजकारण तापणार एवढं नक्की आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget