एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

"आता आमचा पक्ष, आमची मतं अन् आमचंच..."; भुजबळांच्या भेटीनंतर काय म्हणाले प्रकाश शेंडगे?

Prakash Shendge : आजवर इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते. आता ओबीसी-भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढलीय, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

Prakash Shendge : आज छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) आशीर्वाद घेण्यास आलो. आता पुढची रणनिती ठरवणार आहोत. आजवर इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते. आता ओबीसी-भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढलीय, असे वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केले आहे. सोमवारी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसींच्या नव्या पक्षाची घोषणा केली. यानंतर आज मंगळवारी ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश शेंडगे बोलत होते.

प्रकाश शेंडगे म्हणाले की, आज छगन भुजबळांची भेट घेण्यास आलो. काल ओबीसी कार्यकर्ते-नेते यांची बैठक झाली. ओबीसींचा पक्षनिर्माण करणं गरजेचं आहे असं मत बैठकीत व्यक्त झाले. ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेतं. म्हणून ओबीसी-भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्षनिर्माण केला. लोकसभा निवडणूका आमचा पक्ष लढणार. ४८ जागा लढवणार आहोत, असे ते म्हणाले. 

...तर प्रकाश आंबेडकरांना जास्त जागा मिळतील

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आमच्या सोबत यावे त्यांनी आमच्या सोबत येणं हे कर्तव्य आहे. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची बोळवण एक-दोन जागांवर होण्याची शक्यता आहे. आमच्यासोबत आले तर जास्त जागा मिळतील. दलित समाजाच्या दुसऱ्या फळीलाही आम्ही आमच्यासोबत येण्याचे आवाहन करतोय. ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम हे जर एकत्र आले तर ८० टक्के व्होट बॅक आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.   

भुजबळांचा आशिर्वाद घेण्यास आलो

आज छगन भुजबळांचा आशिर्वाद घेण्यास आलो. पुढची रणनिती ठरवणार आहोत. आजवर इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते. आता ओबीसी-भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढलीय. आमचा पक्ष, आमची मतं आणि आमचं सरकार असेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. 

मनोज जरांगेंचे वक्तव्य योग्य नाही

ज्यावेळी भुजबळांना बाहेर पडावंसं वाटेल ते बाहेर येतील. तेव्हा ते आमच्या पक्षाचे नेते असतीलच. त्यांनी राजीनामा दिलाय तो अद्याप स्वीकारलेला नाही. भुजबळांचा राजकीय प्रवास नगरसेवकापासून सुरु झालाय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणालेत की, भुजबळ सरपंच होणार नाहीत, हे वक्तव्य योग्य नाही. भुजबळांनी नाभिक समाजाबाबत केलेलं वक्तव्य वावगं नाही, असेही ते म्हणाले. 

काय म्हणाले छगन भुजबळ?

ओबीसी नेत्यांची कशासाठी बैठक वगैरे होती मला माहित नव्हतं. त्यांनी पक्ष काढायचा वगैरे निर्णय घेतलाय. माझी भूमिका ही आहे की, ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर फोकस आहे. कोर्टाची लढाई सुरु आहे, यावर लक्ष करणं आवश्यक आहे. आम्ही ज्या रॅली घेतो त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात. सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतायेत. अशा वेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार? मतप्रवाह वेगवेगळे वाहतील.  ओबीसी एकत्रित येतायेत त्यात खंड पडेल का? यावर विचार करायला हवा.  माझं स्पष्ट मत आहे की, सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर फोकस असायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

"आधी ग्रामपंचायतीला निवडून या, तुम्ही आमच्या धनगर, नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारलाय"; भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra New CM : दिल्लीत ठरलं!भाजपचाच मुख्यमंत्री; लवकरच औपरचारिक घोषणाEknath Shinde: शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव;शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची चर्चाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
Embed widget