एक्स्प्लोर

''गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा''

औरंगाबाद : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना पाहून आपला वाढदिवस ठरवला या अजित पवार यांच्या दाव्याला प्रकाश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांशी मुंडेंचा संबंध नव्हता तेव्हापासून त्यांचा वाढदिवस आम्ही 12 डिसेंबर रोजीच साजरा करायचो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं. प्रकाश महाजन स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे बंधू आणि गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि मी महाविद्यालयीन जीवनापासून सोबत असून 12 डिसेंबर रोजीच त्यांचा वाढदिवस साजरा करायचो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे, मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा 'माझा कट्टा'वर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा दाखला देत केला होता. धनंजय मुंडेंना तरी त्यांची खरी जन्म तारीख माहिती आहे का, राहुल महाजन यांच्या आठ दिवस आधी जन्मले म्हणून त्यांनी त्यांची जन्म तारीख ठरवली, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंना लगावला. मी मुंडे याना कॉलेजपासून ओळखतो. 12-12 हीच त्यांची जन्म तारीख आहे. 1980 मध्ये पवार यांची ख्याती पाठीत खंजिर खुपसणारा नेता अशी होती, त्यामुळे त्यांची जन्म तारीख ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, असा घणाघातही प्रकाश महाजन यांनी केला. दरम्यान जी व्यक्ती आरोपांना उत्तर देण्यासाठी आज आपल्यात नाही, त्यांच्यावर आरोप करणं दुर्दैवी असल्याचं प्रकाश महाजन म्हणाले. मुंडेंच्या निधनानंतरही असं विधान करणं म्हणजे त्यांची किती धास्ती आहे, हे स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले. ''गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसप्रवेशाविषयी मनमोहन सिंहच सांगू शकतील'' गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासोबत पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र मुंडे हे लोकसभेचे उपनेते होते, अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असं मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही, असा दावाही अजित पवारांनी केला होता. मात्र प्रकाश महाजन यांनी हा दावाही खोडून काढला. तत्कालीन राजकारणाची परिस्थिती आजच्यापेक्षा वेगळी होती. मुंडे काँग्रेसमध्ये जाऊ नयेत म्हणून शरद पवारांनी देव पाण्यात ठेवले होते. मुंडे यांनी या विषयावर कधीही भाष्य केलं नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाविषयी मनमोहन सिंहच खंर सांगू शकतील, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Chandrapur Crime News: चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Family News: विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget