एक्स्प्लोर

Puja Khedkar: पद रद्द केल्यानंतर पूजा खेडकरने UPSC ला कोर्टात खेचलं, उभा दावा मांडला, पण UPSC म्हणालं पत्र पाठवायला तुम्ही जागेवर कुठे होता?

Puja Khedkar: आपल्या मागण्यांमुळे चर्चेत आलेली आणि आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे आपलं आयएएस पद गेलेली पूजा खेडकरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.

Puja Khedkar: आपल्या मागण्यांमुळे चर्चेत आलेली आणि आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे आपलं आयएएस पद गेलेली पूजा खेडकरची (Puja Khedkar) याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. मेरिटवर कमेंट न करता योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचे याचिकर्त्यांना उच्च न्यायालयाने स्वातंत्र्य दिले आहे. पूजा खेडकरच्या (Puja Khedkar) वकिलांनी यूपीएससीने तिचे आयएएस पद रद्द केल्याचं कळवलं नाही, त्यांनी थेट प्रेस नोट काढून सांगितलं असं पूजा खेडकरच्या वकीलांनी कोर्टात सांगितलं आहे. 

यूपीएससीने पूजा खेडकरचे (Puja Khedkar) आयएएस पद रद्द केल्याचे पत्र पाठवणं गरजेचं होतं, असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी कोर्टासमोर केला आहे. त्यावरती यूपीएससीने सांगितलं की ती कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे आम्ही याबाबतचं पत्रक काढलं. आम्ही पुढच्या २ दिवसात तिला मेल आणि तिच्या शेवटच्या पत्यावर ही माहिती पाठवू असंही यावेळी यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. यूपीएससीने दिलेल्या माहितीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे.

न्यायालयाने पूजा खेडकरचा (Puja Khedkar) अटकपूर्व जामीन नाकारला. यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर अब्रुनुकसानीचा दावा करणार

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) पोलिसांना दिली आहे आणि यूपीएससीकडे देखील तशी तक्रार केली होती. पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पुजा खेडकरचा आरोप आहे. दरम्यान या आरोपांबाबत चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स बजवून देखील पूजा खेडकर हजर झालेली नाही.

पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. पूजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचे पूजा खेडकरनी आरोप केले होते. ⁠वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार  पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारीसंदर्भात काही चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget