एक्स्प्लोर
Advertisement
मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित
शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं.
रमेश शिंदे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.
त्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलवरुन संबंधीत मेसेज व्हायरल झाल्याचं आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र एका राजकीय नेत्याच्या अंगरक्षकाने पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण व्हायरल केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात आतापर्यंत सोशल मीडियावर लिखाण करणार्यांना नोटिसा आल्या आहेत. मात्र एखाद्या सरकारी व्यक्तीच्या निलंबनाची कदाचित ही पहिलीच घटना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement