एक्स्प्लोर

सोलापुरातील बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले; मुलानेच केली चारित्र्यहीन बापाची हत्या

संजय काळे यांना टेंभर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला मारून त्यांचा मृतदेह वाहनासह जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता.

पंढरपूर : टेंभुर्णी येथील बेकरी चालकाच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आहे. मुलानेच सहकाऱ्यांच्या मदतीने बापाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. माढा तालुक्यातील शिराळ( टें) येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार काल उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी 24 तासात या हत्येचा गुंता सोडवला असून चारित्र्यहीन बापाची हत्या त्याच्या पोटच्या पोराने केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सध्या या प्रकरणात हत्या झालेला संजय काळे याचा मुलगा व या प्रकरणातील फिर्यादी आकाश काळे यांच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. संजय काळे यांना टेंभर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला मारून त्यांचा मृतदेह वाहनासह जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात करमाळा पोलीस उपअधीक्षक प्रशांत हिरे यांनी संजय काळे याची माहिती गोळा करताना त्याचे चारित्र्य संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी करता त्याचा मुलगाच यात सामील असल्याचा संशय आल्यावर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला.

सोलापुरात बेकरी चालकाची हत्या, मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

या हत्येत आकाश याने त्याचे मित्र लक्ष्मण बंदपट्टे व आलम मुलाणी यांची मदत घेतल्याचे कबूल केले. वडिलांच्या वादग्रस्त चारित्र्यामुळे या बाप-लेकात कायम वादंग होत होते. याच वादातून आकाश याने वडिलांची हत्या करून वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवून जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी (26 जुलै) शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आलं होतं. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेहही दिसला. हा मृतदेह संजय काळे यांचाच असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. शरीराचे छातीपासून थोडावरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. उर्वरित शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget