एक्स्प्लोर
धुळ्यात पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
धुळ्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धुळे : धुळ्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेशसिंग परदेशी असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत होते. रमेशसिंग यांच्या सेवा निवृत्तीला अवघे ४ महिने शिल्लक राहिले होते. मात्र, काल रात्री त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शहरातले डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सध्या पोलीस त्यांच्या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्या शेख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















