एक्स्प्लोर

नाशिक पोलिसांची दंडुकेशाही, 'माझा'च्या चमूलाही धक्काबुक्की

या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली.

नाशिक : आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी केला आहे. या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली. पुण्याहून नाशिकला निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा आज सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवला. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. खरं तर गेल्या 4 दिवसांपासून ही मुलं भर पावसामध्ये पुण्याहून चालत निघाली होती. आपल्या साध्या मागण्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा इरादा होता. पण पोलिसांनी शांततेत चाललेल्या या विद्यार्थ्यांवर दंडुकेशाही सुरु केली. या विद्यार्थ्यांची दखल घेतलेल्या एबीपी माझा या एकमेव वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धमकावलं. त्यांच्या कॅमेऱ्याची नासधूस केली आणि काही काळ डांबूनही ठेवलं. एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि कॅमेरामनला पोलिसांनी धक्काबुक्की केली. शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणं हा गुन्हा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास विद्यार्थी आले होते. पोलीसही तिथे आले. एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा बातमी कव्हर करण्यासाठी गेले. त्यांनाही जवळ जाऊ दिलं नाही. त्यानंतर एबीपी माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी हे घटनास्थळी गेले. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना मुकुल कुलकर्णी आणि किरण कटारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय कॅमेराची नासधुस केली. पोलीस विद्यार्थ्यांच्या जवळही कुणाला जाऊ देत नव्हते. प्रत्येक गाडीची तपासणी करत होते. पोलीस सर्वांना विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्यासाठी प्रवेश नेमका का नाकारत होते, याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. मोर्चा जसा जसा नांदूरच्या जवळ आला, तसे पोलीसही वाढत आले. लवकर निघण्याची घाई केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सर्व विद्यार्थी 18 तारखेला नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तलयासमोर जमणार होते. आदिवासी विद्यार्थी आणि पत्रकारांसोबतचा हा प्रकार लोकशाहीच्या विरोधातला आहे. या अन्यायाविरोधात विधानसभेत प्रश्न उपस्थित करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम
मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम
आईसह चार मुलांना विषबाधा, तीन चिमुकल्यांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादारलं
आईसह चार मुलांना विषबाधा, तीन चिमुकल्यांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादारलं
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र
आता पंढरीत विठ्ठल नाही! तुमच्या बलिदान स्थळी हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजितदादांना भावनिक पत्र

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget