Police dance Viral Video : नुकत्याच पार पडलेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील पोलिसांचा डान्स तुम्ही पाहिला असेल. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पुणे, लातूरसह नाशिक आणि राज्यातील इतर शहरांमध्येही पोलिसांनी केलेले डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गणपती विसर्जनच नाही तर इतर अन्य मिरवणुकीतही अनेकदा पोलिसांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकदा या व्हिडीओचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातं. एका क्षणामध्ये पोलिसांची हिरोगिरी सोशल मीडियावर चर्चेत येते. पण आता यापुढे पोलिसांच्या याच हिरोगिरीवर आळा घालण्यात आला आहे. यापुढे कोणत्याही कार्यक्रमात अथवा मिरवणुकीत पोलिसांना डान्स करता येणार नाही. अथवा सोशल मीडियावर रिल्स करता येणार नाहीत. कारण कायदा सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलिसांच्या सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करणे, फेसबुकवर रिल्स बनविणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पोलिसांचं वर्तन कसं असावं, याबाबत सर्कुलर जारी केली आहे. त्यामुळं आता गणेश विसर्जनावेळी हिरोगिरी करणाऱ्या पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
रिल्स तयार केल्यामुळे उस्मानाबादमधील एसटी महिला वाहकावर झालेल्या कारवाईनंतर पोलीस विभागाचे पत्र चर्चेत आले होते. त्यानंतर सार्वजनिक आयुष्यात पोलिसांच्या वर्तवणुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी निरीक्षण केलं. त्यानंतर पोलिसांची ही कृती स्विकार्य नसल्याचं मत नोंदवलं. त्यानंतर पोलिसांवर काही बंधनं घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच भाग म्हणून सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करणे, फेसबुकवर रिल्स बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली. त्याशिवाय खाकी गणवेशवर मिरवणुकीत वाद्य वाजविणे, नाचणे यावर वरीष्ठअधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. यापुढे आता पोलिसांना रिल्स बनवणे अथवा मिरवणुकीत नाचण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस खाते शिस्तप्रिय खाते आहे. आशा वर्तनामुळे पोलिसांवरील विश्वास कमी होऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कार्यक्षमतेवर संदेह निर्माण होऊ शकतो. पोलिसांची प्रतिमा मलिन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पोलीस अधिकारी अंमलदार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1971 च्या तरतुदींचे पालन करण्यच्या सूचना केल्या. तसेच कायदा सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून राज्यातील सर्व पोलिसांना याबाबतचं परिपत्रक जाहीर करत हिरोगिरीवर बंधनं घातली आहेत.
आणखी वाचा :
RuPay क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 2,000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क नाही
विम्याची रक्कम नाकारणं एलआयसीला महागात; दारु प्यायल्याने मृत्यू झाला म्हणून कव्हर देण्यास दिला होता नकार