एक्स्प्लोर
गुंड आणि बीड पोलिसांमध्ये चकमक, गुंड पिण्या कापसे गंभीर जखमी
बीडः बीड जिल्ह्यात गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. कुविख्यात गुंड सुरेश उर्फ पिण्या कापसे आणि त्याचा साथीदार बाप्पा विघ्ने यांची गेवराई तालुक्यातील हसलगाव येथे पोलीसांबरोबर चकमक झाली. या चकमकीत दोन्ही बाजूने गोळीबार झाला.
या गोळीबारात पोलीसांच्या गोळीने पिण्या कापसे हा गंभीर जखमी झाला असून त्याचा साथीदार देखील जखमी झाला आहे. जखमी झालेल्या दोन्ही आरोपींवर जिल्हा रुग्णालय उपचार सुरु आहेत. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शेवगाव येथील पोलीस हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पिण्या कापसे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला आहे.
बीड स्थानिक गुन्हे शाखेला पिण्या कापसे हा आपल्या साथीदारासोबत हसलगाव परिसरात आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यास पोलिसांनी देखील प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पोलीसांच्या गोळीने पिण्या कापसेच्या कंबरेखाली गोळी लागली आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे, तर त्याचा साथीदार बप्पा विघ्ने हा देखील जखमी झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement