पणजी: भारतातील प्लास्टिक उद्योग (Plastic Industry) हा अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) अविभाज्य भाग आहे, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गोव्यात उद्गार काढले. भारतातून सुमारे 35 हजार कोटी रुपयांचे प्लास्टिक निर्यात केले जाते असं देखील केंद्रीय मंत्री राणे यांनी म्हटलं आहे


गोव्यातील जागतिक एमएसएमई अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधन केलं. अंदाजे 50,000 उद्योग कार्यरत असून यापैकी बहुतेक उद्योग सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे असल्याचं नारायण राणेंनी अधोरेखित केलं. हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत 3.5 लाख कोटींचे योगदान देतात. त्याचप्राणे  50,000 हून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील निर्माण करतात अशी माहितीही त्यांनी दिली. 


आपल्या संबोधनपर भाषणात नारायण राणे प्लास्टिक उद्योगाबाबत बोलताना म्हणाले की, देशातील 60 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होत आहे, जो विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’(Make In India) , ‘स्किल इंडिया’ (Skill India), ‘स्वच्छ भारत’ आणि ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतून प्लास्टिक उत्पादन वाढत आहे. 2027 पर्यंत, प्लॅस्टिक उद्योगाची वार्षिक उलाढाल 10 लाख कोटी आणि निर्यात दोन लाख टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या उद्योगाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असल्याची ग्वाही नारायण राणे यांनी दिली.


प्लास्टिक उद्योगाला चालना देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्लास्टिक उद्योगाचे योगदान खूप मोठे असेल असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. 


गोव्यातील जागतिक एमएसएमई अधिवेशनाचं आयोजन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने याचं आयोजन केले आहे. '5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत भारतीय प्लास्टिक उद्योगासाठी संधी' ही थीम आहे.


दोन दिवसीय परिषदेत, 'सरकारी ई-मार्केट प्लेसद्वारे प्लास्टिक उद्योगासाठी संधी', 'प्लास्टिक उद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या योजना' आणि 'अद्ययावत तंत्रज्ञान' अशा विविध विषयांवर तज्ज्ञ विचारमंथन करणार आहेत. या परिषदेत 250 हून अधिक उद्योग सहभागी होत आहेत, जे तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, B2B बैठका, व्यवसाय नेटवर्किंग, केस स्टडी, सर्वोत्तम पद्धती आणि पॅनेल चर्चा करणार आहेत.


महत्त्वाची बातमी: