एक्स्प्लोर
मयत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा वाकड पोलिसांचा प्रताप
पोलिसांना यासंबंधी विचारलं असता निधन होण्यापूर्वी सासऱ्यांनी त्रास दिला होता, म्हणून गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. पण आता त्यांची चौकशी कशी करणार याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही.
पिंपरी चिंचवड : सहा महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. एक महिलेने तिच्या पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात मारहाण, शिवीगाळ, शिळं अन्न खायला देणं आणि जिवंत जाळण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केल्यावर वाकड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
पण तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले असूनही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला आहे. मयत सासऱ्यांचा मुलगा आणि तक्रारदार महिला यांचा 28 मे 2015 साली विवाह झाला. सहा महिने संसार अगदी आनंदात सुरु होता पण नंतर व्यवसाय टाकण्याचं ठरलं. यासाठी तक्रारदार महिलेला माहेरहून पाच लाख घेऊन यायला सांगितलं. पण त्यास नकार दिला म्हणून चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, शिवीगाळ सुरु झाली. उपाशी ठेवून शिळं अन्न खायला देऊ लागले. अपशब्द वापरुन जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे.
दरम्यान सासऱ्यांचे 27 जून 2018 रोजी निधन झाले. तरीही वाकड पोलिसांनी पती, सासू आणि मयत सासाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला. पोलिसांना यासंबंधी विचारलं असता निधन होण्यापूर्वी सासऱ्यांनी त्रास दिला होता, म्हणून गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. पण आता त्यांची चौकशी कशी करणार याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement