एक्स्प्लोर
पिंपरी-चिंचवडमध्ये 128 जागांसाठी 758 उमेदवार रिंगणात
पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात 128 जागांसाठी 758 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल 480 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
या निवडणुकीसाठी तब्बल 2 हजार 388 अर्ज आले होते. त्यापैकी 1 हजार 239 उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले, तर 143 अर्ज बाद झाले होते. त्याशिवाय छाननीत एकाच उमेदवाराने केलेले दोन ते तीन अर्जही बाजूला काढण्यात आले.
या छाननी अंती एकूण 1 हजार 239 उमेदवार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पात्र ठरले होते.
त्यानंतर दि. 6 आणि 7 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार एकूण 480 जणांनी माघार घेतली.
त्यामुळे आजअखेर अंतिम उमेदवार यादी तयार झाली. ज्यामध्ये 758 उमेदवार पिंपरी-चिंचवडच्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement