एक्स्प्लोर

जप्त केलेले पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर तातडीनं वैद्यकीय वापरात का आणू नये?, हायकोर्टात याचिका

भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच राज्यात पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क यांचा काळा बाजार सुरू आहे. त्यावर सार्वजनिक आरोग्य खाते आणि अन्य खात्यांनी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासह ठिकठिकाणी छापे टाकून या साहित्याचा काळाबाजार रोखत साहित्य जप्त केलं आहे.

मुंबई : देशभरात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्तीत जास्त पीपीई किट्स उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असं असताना काळा बाजार करताना जप्त केलेल्या पीपीई कीट्स पडून राहण्यापेक्षा वापरात का आणल्या जाऊ नये?, अशी मागणी करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. मात्र विविध यंत्रणांनी जप्त केलेले पीपीई किट्स, मास्क, हँड सॅनिटायझर पुन्हा वैद्यकीय वापरात आणण्याबाबत सध्या कोणत्याही मार्गदर्शक नियमावली अस्तित्त्वात नाही अशी माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दिली. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच राज्यात पीपीई कीट्स, हँड सॅनिटायझर, मास्क यांचा काळा बाजार सुरू आहे. त्यावर सार्वजनिक आरोग्य खाते आणि अन्य खात्यांनी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासह ठिकठिकाणी छापे टाकून या साहित्याचा काळाबाजार रोखत साहित्य जप्त केलं आहे. जप्त केलेल हे वैद्यकीय साहित्य वापरात आणावे अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्यासमोर सुनावणी पार पडली. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता जप्त केलेले पीपीई किट्स मास्क, सॅनिटायझर तातडीनं वापरात आणण्याची गरज आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे डॉक्टरांनाही पेशंटवर उपचार करताना या साहित्यांची गरज आहे. मात्र विविध यंत्रणांनी जप्त केलेले पीपीई किट्स, मास्क, हँड सॅनिटायझर पुन्हा वैद्यकीय वापरात आणण्याबाबत सध्या कोणत्याही मार्गदर्शक नियमावली अस्तित्त्वात नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती आणि जनहित लक्षात घेऊन न्यायालयानेच याबाबत निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीनं अॅड. विशाल कानडे यांनी बाजू मांडताना केली. याचिकाकर्त्यांची ही बाजू ऐकून घेत जप्त केलेली सामुग्री सोडवण्यासाठी कुणी अर्ज दाखल करण्यात आला आहे का? अशी विचारणा राज्य सरकराला करत याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं सुनावणी 11 मेपर्यंत तहकूब केली आहे. संंबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
Embed widget